Tuesday, September 8, 2020

गावगाडा

 गावगाडा

आज आमच्या म्हणजे भैरवनाथ मळा पळसे येथील रस्त्याला स्ट्रीट लाईट आले . खूप छान वाटले . कारण गेल्या काही दिवसांपासून बिबटयाची दहशत होती किमान रस्त्याने जाणाऱ्यांना तरी आता ती कमी प्रमाणात जाणवेल हे नक्की या रस्त्याने पुढे दोन गावे आहेत तेथील बरेचसे लोक कंपनीत जातात . त्यांना रात्री अपरात्री गाडीने ये जा करावी लागते त्यांच्यासाठी सुद्धा ही धीराची बाब आहे खर तर खूप पूर्वी रस्त्याचा प्रश्न होता तो कै श्री बापूराव गायधनी यांनी मार्गी लावलां त्यानंतर खूपच वर्षांनी हा प्रश्न ग्रामपंचायत सदस्य श्री अजित गायधनी यांच्या पुढाकाराने व ग्रामसेवकाच्या सहकार्याने तसेच श्री जगन्नाथ आगळेच्या नेतृत्वाखाली सुटला यानंतर पाईपलाईनने पाणी मळे विभागाला मिळणार हे नक्की त्याबरोबरच गटारींचा प्रश्न निकाली निघाला तर फार बर होईल प्रत्येकाच्या आरोग्यासाठी फार महत्वाचे आहे पुन्हा एकदा तरुण नेतृत्व व इच्छाशक्ती असेल तर सर्व शक्य होते हे सिद्ध झाले .एक सुज्ञ मतदार म्हणून आपले आभार.💐

- सौ संगिता विजय क्षिरसागर

1 comment:

गावगाडा

 गावगाडा आज आमच्या म्हणजे भैरवनाथ मळा पळसे येथील रस्त्याला स्ट्रीट लाईट आले . खूप छान वाटले . कारण गेल्या काही दिवसांपासून बिबटयाची दहशत होत...